बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

माझ्या आयुष्यातील मोठ्या बाई


  माझे पान म्हणून नेमक काय लिहाव?? तशी विचाराच्या दुनियेत हरवलेली ती बालपनाचे अविस्मरणीय   क्षण  पुन्हा आठवतेय जनुकाही तिचे जुने दिवस शब्दरूपी भावनात तिला आज मांडायचे आहे... भावनांच्या या ओघात चिंब भिजुन वाऱ्याच्या गतीने आज वहायच आहे... दिसायला साधी थोड़ी सावळी असली तरीही मनाने निर्मळ असणारी कधीही  परतफेडीची अपेक्षा न ठेवता फक्त देण जाणणारी इशिता सहज सर्वांच्या मनात घर करून जाई.  पावलोनि पावले कासवाच्या गतीने का होईना पण प्रगति करायची ही तिची वृत्ति.. याच प्रगतीचे साक्षीदार ठरलेल्या क्षणांनी आज अचानक गर्दी केलिये नी शब्द कागदावर उमटताहेत.. सुरुवात होते ती बालपणीच्या प्रेरणात्मक क्षनापासुन
                  काय आयुष्य असत ना..थांबल की प्रगती संपलीच म्हणून समजा पण थांबल तर तीला प्रगती म्हणायची का? खरेतर असेच प्रश्न विचारून स्वगत करून प्रयत्नांनी प्रगतीची उंची गाठायची इशिताची सवय. योग्य विचाराने माणुस घडत जातो अविचाराने नाही.. चांगल्या विचारांना कृतित आणून स्वतः ला सिद्ध करणे असेच रुजलेले ते विचार होते ज्याचे बालकडू शालेय शिक्षणासोबत इशिताला मिळाले. तीच्या आवडत्या बाई कडून अगदीच तीच बालपण तीला आठवत नाहीये...
                 विस्मरणात गेलेली गोष्ट ती आठवतेय तशी ही शहरात शिकलेली शहरातलीच तिची शाळा नामवंत आणि गाजलेली नसली तरीही शाळा ही शाळा असते जिथे शिक्षक कुम्भाराप्रमाणे विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देत असतो. विद्येच खर माहेरघर ही शाळा असते अस म्हणणारी इशिताला सर्वात पहिल्या शाळेची आजही आठवण होते ती म्हणजे बालवाड़ी. बालवाड़ी म्हणजे शालेच पहिल -वहील पाऊल. ते पायदळ तुडवीत शाळेत जान ! तो लेखनिचा  सुगंध कुठलही अत्तर ज्या पुढे फीके वाटेल अशी ती लेखनी (लेखन) कधी पोटात तर फार कमी वेळा पाटीवर उमटणारी..चांगलीच गट्टी जमलेली लेखनी सोबत. तिनेच तर ती शिकली ना पहिल अक्षर लिहायला. वय वर्ष पाच असताना इयत्ता पहिलिपासुनचा पुढचा प्रवास सुरु झाला शाळा बदलली हीच ती शाळा जी आजही इशिताच्या डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू आणते. जिथे तिच्या आयुष्याला आकार देणारा कुंभार म्हणजे  बाई (शिक्षिका)भेटल्या. प्रेमानी सगळेच त्यांना मोठी बाई म्हणत असे. खरच या नावाप्रमाणेच त्यांचे मन मोठे ममतामयी होते.  वर्ष संपले ती इयत्ता दुसरित गेली आजही आठवतेय ती सरस्वती पूजा. रांगेत लागुन नमस्कार करणे आणि गुड चन्याचा प्रसाद घेणे. प्रसादाचा तो गोडवा कुठल्याही हलवाई च्या दुकानातील मीठाईत मिळणार नाही इतक त्यात बाईच प्रेम असे. ते इवलेसे हात, त्यावर मिळणारा खुप मोठा प्रसाद पण तो वाटुन खाण्याच्या आनंद काय असतो? ती खरी मज्जा काय असते? याच बाळकडू या इवल्याश्या मनावर याच बालवायत कोरल्या गेले. त्यावेळी गृहपाठ आणि लेखनकाम करण्यासाठी दगडाची पाटी असायची , बाईनी गृहपाठ बद्दल विचारल की, पाटी दप्तरातुन काढताच म्हनायच ''बाई पाटीवरच मिटल की हो..यात माझी काय चुक??? हा खट्याळपणा खोड़सरपणा आजही आठवतो आणि हवाहवासा वाटतो.. हुशार आणि समजुतदार विद्यार्थिनीमध्ये इशिता ची गणना होऊ लागली तेव्हा ती 3 री ला होती.तीसरीचा तो क वर्ग जरी असला तरी बाई मात्र त्यात कुठलाही भेदभाव करीत नव्हत्या सारखी वागणूक मिळायची. हा तीसरीचा क वर्ग खास आहे कारण बाईंनी जबाबदारी दिली होती वर्ग़प्रमुखाची यामागे बाईंचा विश्वास आणि प्रेम होत त्यामुळेच हळूहळु  हुशार, समजदार या विद्यार्थ्याँनमध्ये गणना होऊ लागली. एकदा छानसा सुविचार/म्हण लिहून आणायची जबाबदारी मिळाली, "केल्याने होत आहेरे, आधी केलेचि पाहिजे" हाच तो सुविचार जो वर्गात भिंतीवर लावल्यात आला. आज त्याच मर्म खऱ्या अर्थाने कळतय. अमुल्य असे ते संस्कार होते. दिवस सरत चालले होते ज्ञानात भर पडत होती; आणि ते शैक्षणिक वर्ष संपत आले व दिवस आला तो सरस्वती पूजनाचा. ही पूजा बरीच खास होती बर का ! कारण मोठ्या बाईँनी या पूजेला सर्व विद्यार्थ्यांचा फोटो काढला होता. रंगीत ड्रेस घालून जायचा तो दिवस होता म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मोठ्या हौसिने त्याची एक प्रत घरी आणली आणि बघताच सगळे हसू लागले, का? तर फोटोत ती दिसतच नव्हती.ती होती सर्वात मागे आवडत्या मोठ्या बाईँजवळ बाईंच्या त्या छोट्याश्या गोंडस नातिनिच्या शेजारी. एखाद झाडाच कोमल फुल सूर्यप्रकाशाकडे डोकावून बघाव तस ते निरागस मूल डोक उंचावुन फोटोवाल्याकड़े बघत होते.  अगदीच ती चिमुकली डोळे आणि गोजिरवाने गाल इतकाच तो चेहरा दिसत होता. एवढी बाईंबरोबर गट्टी जमली होती. खंत इतकीच आज तो फोटो शोधूनही तीला सापडत नाही.
          तीसरी पासून वर्गप्रमुख असणारी तीला पूढच्यावर्गातही ती जबाबदारी मिळाली याच काळात दोन मैत्रिणी मिळाल्या बऱ्याच वर्षाने एकीसोबत भेट झाली पण एक अजुनही भेटायची आहे.  मोबाइल असायला हवा होता त्यावेळेस असो.. हीच ती मैत्रीण तिने लिहून आणलेला तो "मरावे परी किर्ती रुपे उरावे". हा सुविचार. बाईंनी तर तो भिंतीवर चिटकवला होता आजही तो सुविचार मनावर कोरलेला आहे. मरण हे अटळ सत्य आहे जन्म आणि मरण यादोघांमधील काळात चांगले कर्म करुन त्या किर्तिची साठवण करणे म्हणजे आयुष्य होय .
         पुढल्या वर्षी शाळेची इमारत बदलली ती आता इयत्ता चौथी मध्ये आली. नवी इमारत नवी खोली नवा उत्साह. रांगेत पहिल्या नंबर ला बसण्याची धावपळ होती इथेही बाजी मारलीच कारण बाईंच्या शेजारी बसायला मिळायच. बसन्यासाठी चौकटी आसने होती प्रत्येकाची जागा ठरलेली  आपापली आसने सांभाळायची शाळा सुटली की नीट लावून ठेवायची याच काळात शाळेत 3 किलो तांदुळ मिळायचे त्या दान्यात सारा आनंद सामावून जाई. अभ्यासाचा बाबतीत बाई कड़कच होत्या बाईंच पुन्हा पुन्हा ते पाठ घेण. स्थानिक किमतीच गणित वारंवार समजुन सांगण कारण काहिही केल तरी डोक्यात ते भरेचना कित्ती वेळा मारही खावा लागला. अक्षर सुधार ग म्हणून कितिवेळा वही फेकून दिली जो पर्यंत अक्षर सुधारणार नाहीत तो पर्यंत वही तपासणार नाही अस म्हणायच्या पण त्यांच ममतामयी हृदय मात्र ती वही तपासत होते.  ती तळमळ रागवन्या मागचा हेतु आज लक्षात आलाय ती म्हणते  माफ़ करा बाई तुमच्या लाडक्या इशिताचे अक्षर आजही सुधारले नाहीत आजही तसेच आहेत वाटत पुन्हा मोठ्या बाईनि याव म्हणाव काय ग हे अक्षर कधी सूधारशील म्हणून कानधरनी करावी. काळ पुढे चालत राहिला पण तुमच्या प्रेमळ आठवणी आजही आहेत.
            टिळक जयंतिचा तो दिवस होता बाईनि भाषण लिहायला सांगीतले "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच" अशी सुरुवात पाहून तुम्हाला झालेला आनंद आजही आठवतो. पण हे खरय की आधी अक्षरांसाठी  तुम्ही खुप रागावल आणि पुन्हा ते निटनेटक लिहिल्यावरच वही तपासली त्या रागावन्या मागची तळमळ काळजी आज कळतेय. हा दिवस अगदी सुवर्ण अक्षरात लिहिन्यासारखा होता आयुष्यातील एक अविस्मरनीय दिवस. भाषण ऐकुण सर्वांसमोर केलेल कौतुक आज आठवल की बाई आजही तेवढ्याच कौतुकान पाठ थोपटत असल्याचा भास होतो हाच तो दिवस ज्यानी खरा आत्मविश्वास वाढला. काहीतरी चांगल करू शकन्याचा ध्यास लागला आज आयुष्यात कितीही पुढे गेल तरी पुढे जाण्याचा तो आत्मविश्वास याच दिवसाने मिळाला. एकदा सरस्वती पुजेनिमित्त लिहिलेल भाषण तुम्ही प्रत्येक वर्गात मोठ्याने वाचून दाखवायला लावल.त्यावेळी  मराठी प्राथमिक शाळेचे इयत्ता 4 थी चे चार वर्ग होते.प्रत्येक वर्गात कौतुक आणि मिळणारा दुप्पट प्रसादाने मन आनंदाने उत्सहाने भरभरून आले होते. प्रत्येक वर्गात नवी ओळख मिळाली. त्या दिवशी बाई खरच तुमच्यामुळेच एक नवी ओळख तयार झाली होती  आणि खऱ्या आयुष्यात स्वतःची ओळख निर्माण करण्याची चाहुल लागली..आणि आयुष्यात आत्मविश्वासाच्या जोरावर पुढे जायला शिकली.. बाई तुम्हाला धन्यवाद द्यावे ते तितके कमीच आहे शब्दच सापडेना हो आज.. खरच बाई तुमचे खुप खुप धन्यवाद.
  इशिताचा हात हातात घेतला आणि ती भानावर आली इशिता चे डोळे पाणावले होते नि ओठांवर गोड हसू होत तिच्या गालावर पड़नाऱ्या नाजुक खळी मुळे तीच हसन अगदी मनमोहक वाटत होत. अगदीच हरवलेल बालपण आठवणीच्या रूपात आज तिने पुन्हा अनुभवल होत.मोठ्या बाईंना माझे पान म्हणून एक पत्र तिला लिहायच होत पण बाईंचा पत्ताच मात्र सापडेना..............।।....नकळत माझ्याही डोळ्यात अश्रु दाटले  आणि या तिच्या प्रेरणादायी मोठ्या बाई बद्दल  ऐकुण इशिताचा हेवा वाटला, वाटलं  खरच प्रत्येकाच्या आयुष्यात नक्की अशी एखादी मोठी बाई असावी .. बाईंची शिकवण आजही इशिताला आठवतेय आणि ते ती उपयोगात आणतेय खर तर मोठ्या बाईंसाठी हीच खरी गुरुदक्षिणा होय.।।।
                    
               
    

गुरुवार, ४ जुलै, २०१९

खास आठवणीची साठवण...


आयुष्यात आलेल्या प्रत्येकाला लक्षात ठेवायच नसत
तरीही काही माणसाणा विसरायच देखिल नसत...
आठवणीत त्यांच्या चिंब भिजायच असत
ओठावर नाजुक हसू ठेवुन मनाने त्यात हरवायच असत..
        प्रत्येकाला लक्षात ठेवायच नसत
        तरीही काही माणसाणा विसरायच नसत...
        आठवणीच्या झोपाल्यावर मनसोक्त झुलायच असत..
         तुटेल दोर झोपाल्याचा ही भीती बाळगायची नसते..
         आठवणीच्या बंधाना घट्ट धरून ठेवायच असते...
खरच काही खास मानसांच्या आठ्वणीला कधी विसरायचे नसते....मात्र त्यांची साठवण करायची असते..
        

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

भावना

 या भावना शब्दात सांगणे खरच सोपे नाही, लेकिसाठी बापाच काळीज खरच किती मोठ असत ना! पैश्याने तो कितीही श्रीमंत असो वा कितीही गरीब असो पण मनाने मात्र तो नेहमीच गर्भ श्रीमंत असतो.लेकिवर कितीही जीव लावला तरी त्याच्या श्रीमंतित किंचितही फरक पडत नाहि. लेक कितीही मोठी झाली तरी हा बाप तिच्या पाठीशी असतो त्याच्यासाठी ती तर आजही परिच असते;खरच तो बापच अस्यो स्वतः आयुष्यभर खचत असून लेकीचा मात्र तो आधार असतो. धीरगंभीर प्रवृत्तिने जगणारा हा बापच असतो वय झाल तरीही लेकिला दिलासा देत म्हणतो; "बेटा काळजी करू नकोस,मी आहेना पाठीशी तुज्या."
या बोलण्यातून बाप या नात्याने पुरुष जातीची आई जेव्हा कळतेना तेव्हा खरच मोठ झाल्यासारख वाटतं क्षणात अगदी लहानस बाळ होउन या आईच्या कुशीत शिरावस वाटतं.
                   एक ना अनेक प्रसंगानुरूप बापाच आभाळाएवढ काळीज अनुभवायला मिळतं. खिशात फुटकी कवडी नसेलही कदाचित तरीही लेकीला कमी न पडू देणारा हा बाप स्वतः आजारी असला तरी तो उठतो आणि मी अगदी ठाम आहे अस आवर्जुन सांगतो आणि लेकिला मात्र तळ हाताच्या फोड़ाप्रमाणे जपतो.  खरच बाबा हे असेच असतात.
                   असा बाप सर्वांनाच मिलतो कोणी बाबा म्हणतो कोणी बाबूजी तर कोणी प्रेमाने त्याला दादा म्हणत. नविन पीढितले लोक पप्पा म्हणतात किंवा पप्पाच आत्ता डैडी आणि हल्ली त्याच डैड मध्ये रूपांतर झाल पण काहिही झाल तरी बापच काळीज आजही तसच आहे कारण बाप हा बाप असतो शब्दात त्याची भूमिका मांडण इतक सोप नसत.
                  जीवनाच्या रणांगणात बापाची भूमिका करणारी ही व्यक्ति असे बाबा आणि त्या बापाची लाडकी लेक या दोघांचा सहवास किती काळ असेल यालाही नशीब लागत असत. बाप सगळ काही करतो लेकिसाठी पण बाप थकल्यावर लेकीला मिळत का हो बापाच करण्यासाठी ती तर असेल आपल्या संसारात गुंतलेली.
 खरच नशीबवान असतात त्या मुली ती लेक जिला लाभेल हे अहोभाग्य बाप थकल्यावरती त्याचा आधार बनण्याच भाग्य.  या वृद्ध पित्याला आधाराची गरज असेल तेव्हा लेकिन त्याच्या जवळ असाव यासाठी खरच खुप भाग्य लागत हो. थकलेला बाप आणि कमकुवत झालेली आर्थिक  परिस्तिथि फक्त मोजक्याच जमापुन्जिवर आयुष्य आलेल असतना बापाच्या ह्या जबाबदारीचा  थोडासा वाटा थोडासा भार लेकिने उचलायला खरोखरच भाग्य लागत आणि जिला हे मिळत ती खरोखरच भाग्यवान लेक असते. शेवटी लेक ही परक्याच धन असत बापाच्या घरी यायलाही तीला कदाचित संमती घेवून याव लागत...
           

गुरुवार, १४ जून, २०१८

हक्क हसण्याचा मुक्त जगण्याचा...

 सगळेच म्हणतात हसत खेळत रहा, एकदाच मिळालेल्या या आयुष्याला मनसोक्त जगा..
 हक्क हसण्याचा या विषयावर लिहिताना बऱ्याच प्रसंगाची  आठवन होते. 
           खरच हा हक्क निसर्गाने दिलेली एक अमुल्य  देणगी आहे. नुकताच पहिल्या पावसाने बरसायला सुरुवात  केलि पावसाचा तो पहिला थेंब अंगावर पडताच रोमांच आणि ओठावर अलगद येणार हसू, आणि सोबतीला  मातीचा तो  सुगंध खरचं किती आल्हाददायक होत हे सगळ!
या निसर्गाच्या सौंदर्याची अनुभूति घेतली की नकळत    चेहरयाव़र हास्य खुलू लागत. ह्या हसन्याचेपण किती नानाविध प्रकार असतात ना....
कधी स्मित हास्य तर कधी अगदीच खळखळून हसनं... हसण्याची जादूच अशी आहे मनामनात घर करणारी,हृदयाला प्रफ़ुल्लित ठेवणारी.
        "स्मित हास्य येताच ओठावर मन होई प्रसन्न ऐसे 
        नाजुक वेलिवरचे फुल जैसे".
             पण आजच्या या धावपळीच्या जीवनात स्वतःच अस्तित्व शोधू पाहणारा माणुस जणू हसण्याचा हक्कच विसरला आहे... मुक्त जगण्याचा आनंद कुठेतरी हरवत चाललाय.. याच रोजच्या जगण्यात आनंद शोधला तर.....
             सहज वाटेवरून चालताना एखाद्याला स्मितहास्य दिल तर काय होत... अहो। देऊन तर बघा ना! ही सुद्धा माणसेच आहेत की..होउद्याना साखळी या ओठांवरच्या  
स्मित हास्याची;फुटुदे पालवी मनामनातल्या गोडव्याची..
             सकाळपासून उन्हातान्हात लहान लेकरासोबत भाजी विकणारी आई असो किंवा एखादी आजीबाई असो, कपाळावर आठ्या ओढवून पैसे देण्यापेक्षा ओठावर स्मितहास्य खुलवुन पैसे दिलेत तर.... करून बघा...
             घाईघाईने ऑफिसला जाताना आपल्याला पेट्रोल भरायचा असतो,पण तो किंवा ती सकाळपासून उन असो  थंडी,वारा, पाऊस काहिही असताना नेहमीच आपल्या सेवे साठी हजर असतात त्याचवेळी पेट्रोलच्या मीटरकड़े लक्ष असताना पेट्रोल भारणाऱ्याला थैंक्यू म्हणून तर बघा.. परतफेडही त्याच प्रतिसादाने होणार.
ह्याच लहानसहान आनंदाला अनुभवून जीवनाचा आनंद घ्या तो स्वतः निर्माण करा...
             सिग्नल वरुन रस्ता ओलांडताना ट्राफिक पोलिसाकडे तिरप्या नजरेने बघन्यापेक्षा नियमपाळत ताठ मानेने जाताना एक गोड हसू त्याला देऊन तर चला...
             लग्नसमारंभात मिरवत असतोच आपण, वेडे वाकडे तोंड करून सेल्फ़ि घेत असतो, या सर्वात तिथेच असलेल्या वधुच्या पित्याला सहज भेटून हसून बोलुन तर बघा.. त्या पित्याच्या खुललेला चेहरा बघून तुम्हाला आनंद नाही झाला तर नवलच नाही का...???
लग्नसमारंभात एकाचवेळी जेवनाला झालेली गर्दी हे सगळे साहजिकच आहे, पण ताटात जेवण घेतेवेली जेवण वाढणारा आपल्या समोरच उभा असतो; याकडे मात्र आपल भान नसतं, जितक्या उतुस्कतेने पंच्पक्वाने ताटात घेतल्या जातात त्याच गोडव्याने आपल्याला वाढणाऱ्या त्या वेटरला एक स्मित हास्य देऊन तर बघा.
                  असेच काही प्रसंग रोजच्या आयुष्यात येत असतात; पण आपण मात्र सुखाच्या शोधत भटकत असतो...
आयुष्य खरच खुप सुंदर आहे. ते तस जगायला हवं.          ह्या छोट्या परंतु खुप महत्वाच्या गोष्टी आहेत अस मला वाटतं, त्या करून तर बघा..
सुखाच्या शोधात फिरन्यापेक्षा आनंदाची ही दूसरी बाजु अनुभवुन तर बघा...
यात आपल्या हसण्याचा हक्क शोधुन तर बघा...
आयुष्याचा नानाविध प्रसंगात हक्क हसण्याचा गमावू नका; त्याला मुक्तपणे जगायला शिका..

मला

आवडलेले मी अनुभवलेले प्रसंग सांगीतले तुम्हीही करून बघा... 😃

सोमवार, २८ मे, २०१८

मन हे ऐसे कैसे रे...

    मायेचा सहवास प्रेमाची ओढ़ सार कही हव असतं, पण दुखलच कधी मन तर या अपेक्षा जर पूर्ण नाही झाल्या तर का उदास होत हे मन? का कोणाच्या जवळ जाऊ नए आजच कळतय का सार,की माहित असुनही भावनेच्या ओघात वाहत गेलय हे मन. का कुणी करावे आणि करू नय़े हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न तो आपल्यापर्यंत पोहोचेलच ही आशा खोटी ठरावी असच का घडाव नेमकं की आपल्याच भावनेच हसू व्हावं आणि समोरच्याला किञ्चितहि जाणिव नसावी, दुखलेच कधी मन तर माफ़ करा अस मी च का म्हणाव, का त्यालाही दिसू नय़े माझ मन! न बोलता सारच समझेल किंवा समजाव अस जरी नसेल तरी सांगीतल तर समजुन घ्यायला हे मन काय कमी थोडं। असच सुरु असाव का खेळ मनाच्या कोडयांचा? का उलगडता उलगडत नाहीत ही कोडी म्हनुनच एकच मार्ग सर्व पचवन्याची तयारी हवि या दुनियादारित. ही किमया सार्या मनाची. नात हे जोड़त जात अलगद कुनाशिही, मग का खेळ मांडतात भावनांचा... वाहत्या प़ान्याइत्क्या सोप्प्या वाटतात का त्या? मग कठोर होऊनि भावनेनेच म्हणावे उठावे,सावरावे असे मज मी सांगावे सावध हो सावध हो मनारे ही दुनियादारी इतकी सोपी  नाही रे, सोपी नाही रे......