गुरुवार, १४ जून, २०१८

हक्क हसण्याचा मुक्त जगण्याचा...

 सगळेच म्हणतात हसत खेळत रहा, एकदाच मिळालेल्या या आयुष्याला मनसोक्त जगा..
 हक्क हसण्याचा या विषयावर लिहिताना बऱ्याच प्रसंगाची  आठवन होते. 
           खरच हा हक्क निसर्गाने दिलेली एक अमुल्य  देणगी आहे. नुकताच पहिल्या पावसाने बरसायला सुरुवात  केलि पावसाचा तो पहिला थेंब अंगावर पडताच रोमांच आणि ओठावर अलगद येणार हसू, आणि सोबतीला  मातीचा तो  सुगंध खरचं किती आल्हाददायक होत हे सगळ!
या निसर्गाच्या सौंदर्याची अनुभूति घेतली की नकळत    चेहरयाव़र हास्य खुलू लागत. ह्या हसन्याचेपण किती नानाविध प्रकार असतात ना....
कधी स्मित हास्य तर कधी अगदीच खळखळून हसनं... हसण्याची जादूच अशी आहे मनामनात घर करणारी,हृदयाला प्रफ़ुल्लित ठेवणारी.
        "स्मित हास्य येताच ओठावर मन होई प्रसन्न ऐसे 
        नाजुक वेलिवरचे फुल जैसे".
             पण आजच्या या धावपळीच्या जीवनात स्वतःच अस्तित्व शोधू पाहणारा माणुस जणू हसण्याचा हक्कच विसरला आहे... मुक्त जगण्याचा आनंद कुठेतरी हरवत चाललाय.. याच रोजच्या जगण्यात आनंद शोधला तर.....
             सहज वाटेवरून चालताना एखाद्याला स्मितहास्य दिल तर काय होत... अहो। देऊन तर बघा ना! ही सुद्धा माणसेच आहेत की..होउद्याना साखळी या ओठांवरच्या  
स्मित हास्याची;फुटुदे पालवी मनामनातल्या गोडव्याची..
             सकाळपासून उन्हातान्हात लहान लेकरासोबत भाजी विकणारी आई असो किंवा एखादी आजीबाई असो, कपाळावर आठ्या ओढवून पैसे देण्यापेक्षा ओठावर स्मितहास्य खुलवुन पैसे दिलेत तर.... करून बघा...
             घाईघाईने ऑफिसला जाताना आपल्याला पेट्रोल भरायचा असतो,पण तो किंवा ती सकाळपासून उन असो  थंडी,वारा, पाऊस काहिही असताना नेहमीच आपल्या सेवे साठी हजर असतात त्याचवेळी पेट्रोलच्या मीटरकड़े लक्ष असताना पेट्रोल भारणाऱ्याला थैंक्यू म्हणून तर बघा.. परतफेडही त्याच प्रतिसादाने होणार.
ह्याच लहानसहान आनंदाला अनुभवून जीवनाचा आनंद घ्या तो स्वतः निर्माण करा...
             सिग्नल वरुन रस्ता ओलांडताना ट्राफिक पोलिसाकडे तिरप्या नजरेने बघन्यापेक्षा नियमपाळत ताठ मानेने जाताना एक गोड हसू त्याला देऊन तर चला...
             लग्नसमारंभात मिरवत असतोच आपण, वेडे वाकडे तोंड करून सेल्फ़ि घेत असतो, या सर्वात तिथेच असलेल्या वधुच्या पित्याला सहज भेटून हसून बोलुन तर बघा.. त्या पित्याच्या खुललेला चेहरा बघून तुम्हाला आनंद नाही झाला तर नवलच नाही का...???
लग्नसमारंभात एकाचवेळी जेवनाला झालेली गर्दी हे सगळे साहजिकच आहे, पण ताटात जेवण घेतेवेली जेवण वाढणारा आपल्या समोरच उभा असतो; याकडे मात्र आपल भान नसतं, जितक्या उतुस्कतेने पंच्पक्वाने ताटात घेतल्या जातात त्याच गोडव्याने आपल्याला वाढणाऱ्या त्या वेटरला एक स्मित हास्य देऊन तर बघा.
                  असेच काही प्रसंग रोजच्या आयुष्यात येत असतात; पण आपण मात्र सुखाच्या शोधत भटकत असतो...
आयुष्य खरच खुप सुंदर आहे. ते तस जगायला हवं.          ह्या छोट्या परंतु खुप महत्वाच्या गोष्टी आहेत अस मला वाटतं, त्या करून तर बघा..
सुखाच्या शोधात फिरन्यापेक्षा आनंदाची ही दूसरी बाजु अनुभवुन तर बघा...
यात आपल्या हसण्याचा हक्क शोधुन तर बघा...
आयुष्याचा नानाविध प्रसंगात हक्क हसण्याचा गमावू नका; त्याला मुक्तपणे जगायला शिका..

मला

आवडलेले मी अनुभवलेले प्रसंग सांगीतले तुम्हीही करून बघा... 😃