बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

माझ्या आयुष्यातील मोठ्या बाई


  माझे पान म्हणून नेमक काय लिहाव?? तशी विचाराच्या दुनियेत हरवलेली ती बालपनाचे अविस्मरणीय   क्षण  पुन्हा आठवतेय जनुकाही तिचे जुने दिवस शब्दरूपी भावनात तिला आज मांडायचे आहे... भावनांच्या या ओघात चिंब भिजुन वाऱ्याच्या गतीने आज वहायच आहे... दिसायला साधी थोड़ी सावळी असली तरीही मनाने निर्मळ असणारी कधीही  परतफेडीची अपेक्षा न ठेवता फक्त देण जाणणारी इशिता सहज सर्वांच्या मनात घर करून जाई.  पावलोनि पावले कासवाच्या गतीने का होईना पण प्रगति करायची ही तिची वृत्ति.. याच प्रगतीचे साक्षीदार ठरलेल्या क्षणांनी आज अचानक गर्दी केलिये नी शब्द कागदावर उमटताहेत.. सुरुवात होते ती बालपणीच्या प्रेरणात्मक क्षनापासुन
                  काय आयुष्य असत ना..थांबल की प्रगती संपलीच म्हणून समजा पण थांबल तर तीला प्रगती म्हणायची का? खरेतर असेच प्रश्न विचारून स्वगत करून प्रयत्नांनी प्रगतीची उंची गाठायची इशिताची सवय. योग्य विचाराने माणुस घडत जातो अविचाराने नाही.. चांगल्या विचारांना कृतित आणून स्वतः ला सिद्ध करणे असेच रुजलेले ते विचार होते ज्याचे बालकडू शालेय शिक्षणासोबत इशिताला मिळाले. तीच्या आवडत्या बाई कडून अगदीच तीच बालपण तीला आठवत नाहीये...
                 विस्मरणात गेलेली गोष्ट ती आठवतेय तशी ही शहरात शिकलेली शहरातलीच तिची शाळा नामवंत आणि गाजलेली नसली तरीही शाळा ही शाळा असते जिथे शिक्षक कुम्भाराप्रमाणे विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देत असतो. विद्येच खर माहेरघर ही शाळा असते अस म्हणणारी इशिताला सर्वात पहिल्या शाळेची आजही आठवण होते ती म्हणजे बालवाड़ी. बालवाड़ी म्हणजे शालेच पहिल -वहील पाऊल. ते पायदळ तुडवीत शाळेत जान ! तो लेखनिचा  सुगंध कुठलही अत्तर ज्या पुढे फीके वाटेल अशी ती लेखनी (लेखन) कधी पोटात तर फार कमी वेळा पाटीवर उमटणारी..चांगलीच गट्टी जमलेली लेखनी सोबत. तिनेच तर ती शिकली ना पहिल अक्षर लिहायला. वय वर्ष पाच असताना इयत्ता पहिलिपासुनचा पुढचा प्रवास सुरु झाला शाळा बदलली हीच ती शाळा जी आजही इशिताच्या डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू आणते. जिथे तिच्या आयुष्याला आकार देणारा कुंभार म्हणजे  बाई (शिक्षिका)भेटल्या. प्रेमानी सगळेच त्यांना मोठी बाई म्हणत असे. खरच या नावाप्रमाणेच त्यांचे मन मोठे ममतामयी होते.  वर्ष संपले ती इयत्ता दुसरित गेली आजही आठवतेय ती सरस्वती पूजा. रांगेत लागुन नमस्कार करणे आणि गुड चन्याचा प्रसाद घेणे. प्रसादाचा तो गोडवा कुठल्याही हलवाई च्या दुकानातील मीठाईत मिळणार नाही इतक त्यात बाईच प्रेम असे. ते इवलेसे हात, त्यावर मिळणारा खुप मोठा प्रसाद पण तो वाटुन खाण्याच्या आनंद काय असतो? ती खरी मज्जा काय असते? याच बाळकडू या इवल्याश्या मनावर याच बालवायत कोरल्या गेले. त्यावेळी गृहपाठ आणि लेखनकाम करण्यासाठी दगडाची पाटी असायची , बाईनी गृहपाठ बद्दल विचारल की, पाटी दप्तरातुन काढताच म्हनायच ''बाई पाटीवरच मिटल की हो..यात माझी काय चुक??? हा खट्याळपणा खोड़सरपणा आजही आठवतो आणि हवाहवासा वाटतो.. हुशार आणि समजुतदार विद्यार्थिनीमध्ये इशिता ची गणना होऊ लागली तेव्हा ती 3 री ला होती.तीसरीचा तो क वर्ग जरी असला तरी बाई मात्र त्यात कुठलाही भेदभाव करीत नव्हत्या सारखी वागणूक मिळायची. हा तीसरीचा क वर्ग खास आहे कारण बाईंनी जबाबदारी दिली होती वर्ग़प्रमुखाची यामागे बाईंचा विश्वास आणि प्रेम होत त्यामुळेच हळूहळु  हुशार, समजदार या विद्यार्थ्याँनमध्ये गणना होऊ लागली. एकदा छानसा सुविचार/म्हण लिहून आणायची जबाबदारी मिळाली, "केल्याने होत आहेरे, आधी केलेचि पाहिजे" हाच तो सुविचार जो वर्गात भिंतीवर लावल्यात आला. आज त्याच मर्म खऱ्या अर्थाने कळतय. अमुल्य असे ते संस्कार होते. दिवस सरत चालले होते ज्ञानात भर पडत होती; आणि ते शैक्षणिक वर्ष संपत आले व दिवस आला तो सरस्वती पूजनाचा. ही पूजा बरीच खास होती बर का ! कारण मोठ्या बाईँनी या पूजेला सर्व विद्यार्थ्यांचा फोटो काढला होता. रंगीत ड्रेस घालून जायचा तो दिवस होता म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मोठ्या हौसिने त्याची एक प्रत घरी आणली आणि बघताच सगळे हसू लागले, का? तर फोटोत ती दिसतच नव्हती.ती होती सर्वात मागे आवडत्या मोठ्या बाईँजवळ बाईंच्या त्या छोट्याश्या गोंडस नातिनिच्या शेजारी. एखाद झाडाच कोमल फुल सूर्यप्रकाशाकडे डोकावून बघाव तस ते निरागस मूल डोक उंचावुन फोटोवाल्याकड़े बघत होते.  अगदीच ती चिमुकली डोळे आणि गोजिरवाने गाल इतकाच तो चेहरा दिसत होता. एवढी बाईंबरोबर गट्टी जमली होती. खंत इतकीच आज तो फोटो शोधूनही तीला सापडत नाही.
          तीसरी पासून वर्गप्रमुख असणारी तीला पूढच्यावर्गातही ती जबाबदारी मिळाली याच काळात दोन मैत्रिणी मिळाल्या बऱ्याच वर्षाने एकीसोबत भेट झाली पण एक अजुनही भेटायची आहे.  मोबाइल असायला हवा होता त्यावेळेस असो.. हीच ती मैत्रीण तिने लिहून आणलेला तो "मरावे परी किर्ती रुपे उरावे". हा सुविचार. बाईंनी तर तो भिंतीवर चिटकवला होता आजही तो सुविचार मनावर कोरलेला आहे. मरण हे अटळ सत्य आहे जन्म आणि मरण यादोघांमधील काळात चांगले कर्म करुन त्या किर्तिची साठवण करणे म्हणजे आयुष्य होय .
         पुढल्या वर्षी शाळेची इमारत बदलली ती आता इयत्ता चौथी मध्ये आली. नवी इमारत नवी खोली नवा उत्साह. रांगेत पहिल्या नंबर ला बसण्याची धावपळ होती इथेही बाजी मारलीच कारण बाईंच्या शेजारी बसायला मिळायच. बसन्यासाठी चौकटी आसने होती प्रत्येकाची जागा ठरलेली  आपापली आसने सांभाळायची शाळा सुटली की नीट लावून ठेवायची याच काळात शाळेत 3 किलो तांदुळ मिळायचे त्या दान्यात सारा आनंद सामावून जाई. अभ्यासाचा बाबतीत बाई कड़कच होत्या बाईंच पुन्हा पुन्हा ते पाठ घेण. स्थानिक किमतीच गणित वारंवार समजुन सांगण कारण काहिही केल तरी डोक्यात ते भरेचना कित्ती वेळा मारही खावा लागला. अक्षर सुधार ग म्हणून कितिवेळा वही फेकून दिली जो पर्यंत अक्षर सुधारणार नाहीत तो पर्यंत वही तपासणार नाही अस म्हणायच्या पण त्यांच ममतामयी हृदय मात्र ती वही तपासत होते.  ती तळमळ रागवन्या मागचा हेतु आज लक्षात आलाय ती म्हणते  माफ़ करा बाई तुमच्या लाडक्या इशिताचे अक्षर आजही सुधारले नाहीत आजही तसेच आहेत वाटत पुन्हा मोठ्या बाईनि याव म्हणाव काय ग हे अक्षर कधी सूधारशील म्हणून कानधरनी करावी. काळ पुढे चालत राहिला पण तुमच्या प्रेमळ आठवणी आजही आहेत.
            टिळक जयंतिचा तो दिवस होता बाईनि भाषण लिहायला सांगीतले "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच" अशी सुरुवात पाहून तुम्हाला झालेला आनंद आजही आठवतो. पण हे खरय की आधी अक्षरांसाठी  तुम्ही खुप रागावल आणि पुन्हा ते निटनेटक लिहिल्यावरच वही तपासली त्या रागावन्या मागची तळमळ काळजी आज कळतेय. हा दिवस अगदी सुवर्ण अक्षरात लिहिन्यासारखा होता आयुष्यातील एक अविस्मरनीय दिवस. भाषण ऐकुण सर्वांसमोर केलेल कौतुक आज आठवल की बाई आजही तेवढ्याच कौतुकान पाठ थोपटत असल्याचा भास होतो हाच तो दिवस ज्यानी खरा आत्मविश्वास वाढला. काहीतरी चांगल करू शकन्याचा ध्यास लागला आज आयुष्यात कितीही पुढे गेल तरी पुढे जाण्याचा तो आत्मविश्वास याच दिवसाने मिळाला. एकदा सरस्वती पुजेनिमित्त लिहिलेल भाषण तुम्ही प्रत्येक वर्गात मोठ्याने वाचून दाखवायला लावल.त्यावेळी  मराठी प्राथमिक शाळेचे इयत्ता 4 थी चे चार वर्ग होते.प्रत्येक वर्गात कौतुक आणि मिळणारा दुप्पट प्रसादाने मन आनंदाने उत्सहाने भरभरून आले होते. प्रत्येक वर्गात नवी ओळख मिळाली. त्या दिवशी बाई खरच तुमच्यामुळेच एक नवी ओळख तयार झाली होती  आणि खऱ्या आयुष्यात स्वतःची ओळख निर्माण करण्याची चाहुल लागली..आणि आयुष्यात आत्मविश्वासाच्या जोरावर पुढे जायला शिकली.. बाई तुम्हाला धन्यवाद द्यावे ते तितके कमीच आहे शब्दच सापडेना हो आज.. खरच बाई तुमचे खुप खुप धन्यवाद.
  इशिताचा हात हातात घेतला आणि ती भानावर आली इशिता चे डोळे पाणावले होते नि ओठांवर गोड हसू होत तिच्या गालावर पड़नाऱ्या नाजुक खळी मुळे तीच हसन अगदी मनमोहक वाटत होत. अगदीच हरवलेल बालपण आठवणीच्या रूपात आज तिने पुन्हा अनुभवल होत.मोठ्या बाईंना माझे पान म्हणून एक पत्र तिला लिहायच होत पण बाईंचा पत्ताच मात्र सापडेना..............।।....नकळत माझ्याही डोळ्यात अश्रु दाटले  आणि या तिच्या प्रेरणादायी मोठ्या बाई बद्दल  ऐकुण इशिताचा हेवा वाटला, वाटलं  खरच प्रत्येकाच्या आयुष्यात नक्की अशी एखादी मोठी बाई असावी .. बाईंची शिकवण आजही इशिताला आठवतेय आणि ते ती उपयोगात आणतेय खर तर मोठ्या बाईंसाठी हीच खरी गुरुदक्षिणा होय.।।।
                    
               
    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा